बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम त्याची पत्नी प्रिया रुंचालसोबत गायक एड शिरीनच्या कॉन्सर्टसाठी शिलाँगला पोहोचला. या कॉन्सर्टमध्ये काढलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गायक एड शीरन 12 फेब्रुवारी रोजी शिलाँगमध्ये त्याच्या भारत दौऱ्या दरम्यान संगीत कार्यक्रम सादर करत आहे.
पोलोच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा कॉन्सर्ट पार पडला. जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांनीही या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. जॅान आणि त्याची पत्नी प्रिया या दोघांनाही गायक एड शिरीन यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रिया रुंचालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एड शिरीनसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटोसोबत काही व्हिडिओही शेअर केले आहेत. प्रिया रुंचालने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत एड शिरीन आणि जॉन अब्राहम दिसत आहेत. या फोटोंसोबत जॉन आणि त्याच्या पत्नीने नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीच्या मुलांसोबतचे देखील फोटोही शेअर केले आहेत.
अलीकडेच ऍड शिरीनने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथे गायक अरिजित सिंगसोबत दिसला. दोघेही संध्याकाळी स्कूटर जात असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओत अरिजित सिंग एड शीरनसोबत स्कूटर चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.
जॅानचा आगामी प्रोजेक्ट
जॉन अब्राहम 7 मार्च 2025 रोजी त्याच्या आगामी ‘द डिप्लोमॅट’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा थ्रिलर चित्रपट असून शिवम नायर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी जॉन वेदा, पठाण, सत्यमेव जयते आणि तेहरान या चित्रपटांमध्ये दिसला आहे. याआधी जॉन अब्राहम अभिनेत्री संजीदा शेखसोबत एका म्युझिक अल्बममध्येही दिसला होता.