The Diplomat Box Office collection: जॉन अब्राहमच्या ‘द डिप्लोमॅट’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

The Diplomat Box Office: जॉन अब्राहम सध्या त्याच्या ‘द डिप्लोमॅट’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जवळपास 4 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत सादिया खतीब आणि कुमुद मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. डिप्लोमॅट चित्रपटाला विक्की कौशलच्या ‘छावा’मुळे कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. अनेक आठवड्यांनंतरही छावा चित्रपटगृहांमध्ये कायम आहे.
ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅटने पहिल्या दिवशी भारतात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची सरासरी व्याप्ती 20.45% होती जी दिवसभर बदलत राहिली. वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जॉन अब्राहमच्या ‘द डिप्लोमॅट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती, पण लक्ष्मण उतेकरच्या छावासोबत या चित्रपटाला कठीण स्पर्धा आहे. रिलीजच्या अनेक आठवड्यांनंतरही छावा बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवत आहे. छावाने पाचव्या शुक्रवारी 7.25 कोटींची कमाई केली आहे. ‘द डिप्लोमॅट’ची सुरुवात चांगली झाली आहे पण त्याची खरी परीक्षा वीकेंडला होणार आहे. या चित्रपटाला ‘छावा’ आणि इतर चित्रपटांकडून कडवी स्पर्धा आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
शिवम नायरचा ‘द डिप्लोमॅट’ हा सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे, जो उझमा अहमद या भारतीय महिलेची कहाणी सांगतो, उझमाचे पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने लग्न केले गेले होते. जॉन अब्राहम राजनयिक जेपी सिंग यांची भूमिका साकारत आहे, ज्यांनी उझमा अहमदला सुरक्षितपणे भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सादिया खतीबने उझमा अहमदची भूमिका साकारली आहे. द डिप्लोमॅटने भारत-पाकिस्तान संबंधांना एक नवीन दृष्टीकोन दिलेला आहे, ज्यामध्ये जॉन अब्राहमने दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.





