Joe Root Century : …तर हेडनला नग्न धावावं लागलं असतं! रुटच्या शतकाने वाचवली लाज

Joe Root Century Matthew Hayden’s honor save : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस २०२५-२६ मालिकेतील दुसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळली जात आहे. या डे-नाईट आणि पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटने शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलिया माजी खेळाडू मॅथ्यू हेडन यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रुटच्या शतकानंतर हेडन यांनी का सुटकेचा निःश्वास सोडला? या मागे काय कारण आहे? जाणून घेऊया.
दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटच्या नावावर राहिला. त्याने आपल्या १६० व्या कसोटीत ४० वे, पण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिले शतक झळकावले. रूटच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलियन दिग्गजमॅथ्यू हेडन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रूटला हेडन यांनी शुभेच्छा दिल्याचा आणि आनंद व्यक्त केल्याचा व्हिडिओ क्रिकेट इंग्लंडने शेअर केला आहे.
हेडन यांनी का सोडला सुटकेचा निःश्वास?
Is Matthew Hayden concerned he might have to run naked across the MCG if Joe Root gets a century?! 😅🏃 pic.twitter.com/xbnl7KALGV
— Sky Sports Cricket (@SkyCricket) December 2, 2025
जो रूटच्या शतकामुळे हेडन इतके आनंदित का झाले, यामागे त्यांचे एक जुने विधान कारणीभूत आहे. अॅशेस २०२५-२६ मालिका सुरू होण्यापूर्वी हेडन यांनी म्हटले होते की, जर जो रूटने या कसोटी मालिकेत एकही शतक झळकावले नाही, तर ते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कपड्यांशिवाय (नग्न) धावतील. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत रूट ० आणि ८ धावांवर बाद झाल्याने, इंग्लंड दोन दिवसांतच सामना हरले होते. त्यावेळी सोशल मीडियावर हेडन यावर आता नर्व्हस झाले असतील, अशी टीका झाली होती.
हेही वाचा – AUS vs ENG : जबरदस्त! कॅरीने झेल घेण्यासाठी लाबुशेनला दिली जोरदार धडक; थरारक झेलचा VIDEO व्हायरल
रूटने शतक मारले आणि हेडन वाचले!
Congratulations 𝙹̶𝚘̶𝚎̶ ̶𝚁̶𝚘̶𝚘̶𝚝̶ Matthew Hayden 😂💗 pic.twitter.com/2PiYFwhpa3
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 4, 2025
पण आता जो रूटने शतक ठोकल्यामुळे, मॅथ्यू हेडन यांनी निश्चितच सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कारण ते दिलेले वचन पूर्ण करण्याच्या अडचणीतून वाचले आहेत. रूटने शतक करताच आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सनेही एक पोस्ट शेअर करून हेडन यांच्यावर टोमणा मारला. “आम्ही तर आनंदात आहोतच, पण आमच्यापेक्षा जास्त आनंदात आणखी कोणीतरी आहे,” असे राजस्थान रॉयल्सने म्हटले, ज्यात रूट आणि हेडनचा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा – ILT20 League 2025 : ६,६,६,६,६….केकेआरच्या फलंदाजाचा मोठा धमाका! एकाच षटकात ठोकले तब्बल ‘इतके’ षटकार
गाबा कसोटीचा पहिला दिवस –
Let’s cross LIVE to Matthew Hayden after Joe Root’s century…
😂 #Ashes pic.twitter.com/4Wnnp5vsMN
— 7Cricket (@7Cricket) December 4, 2025
तसेच सोशल मीडियावर हेडनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ते ‘येस’ म्हणताना दिसत आहेत. यावरून ते रूटच्या शतकामुळे खरोखरच आनंदी असल्याचे दिसून येते. गाबावरील कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडने ९ विकेट्स गमावून ३२५ धावा केल्या आहेत. जो रूट १३२ धावांवर, तर जोफ्रा आर्चर ३२ धावांवर नाबाद आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.





