IND vs ENG : जो रूटने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा बनला पहिलाच खेळाडू

IND vs ENG Joe Root Breaks Rahul Dravid Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव भारतीय संघाने ३८७ धावांवर रोखला. यानंतर भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावातील दुसरा धक्का करुन नायरच्या विकेट्सने बसला. दरम्यान जो रुटने करुण नायरचा झेल पकडून इतिहास रचला. त्याने राहुल द्रविडचा एक खास विक्रम मोडला आहे.
जो रूटने मोडला द्रविडचा विक्रम –
जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणारा खेळाडू ठरला आहे. त्याने क्षेत्ररक्षक म्हणून २११ झेल पकडले असून, हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रूटने इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर करुण नायरचा झेल पकडला. या झेलसह त्याने राहुल द्रविडला मागे टाकले. द्रविडने २१० झेल पकडले होते आणि आता तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
Is there anything Joe Root cannot do? pic.twitter.com/4PdyBaGnLq
— Bazball™️ (@BazballNation) July 11, 2025
Safest pair of hands in Test cricket 🙌
Joe Root now leads the pack for the most grabs in the longest format of the game 👏#ENGvIND #WTC27 pic.twitter.com/CFlXYFqtZF
— ICC (@ICC) July 11, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू:
Joe Root goes clear of Rahul Dravid – the most catches by a fielder in Test cricket 👏 pic.twitter.com/n0FE344ILQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 11, 2025
- २११* जो रूट
- २१० राहुल द्रविड
- २०५ महेला जयवर्धने
- २०० स्टीव्हन स्मिथ
- २०० जॅक कॅलिस
- १९६ रिकी पॉन्टिंग
हेही वाचा – Curtis Campher : आयर्लंडच्या कॅम्फरचा मोठा धमाका! सलग पाच चेंडूंत ५ विकेट्स घेत रचला इतिहास, पाहा VIDEO
भारताला गिलच्या रुपाने तिसरा धक्का –
भारताला पहिल्या डावात शुबमन गिलच्या रुपाने तिसरा धक्का बसला. ख्रिस वोक्सने शुबमन गिलला बाद केले. गेल्या कसोटीत द्विशतक आणि एक शतक झळकावणारा कर्णधार गिल तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चांगली कामगिरी करू शकला नाही आणि १६ धावा काढून बाद झाला. भारतासाठी दिलासा म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला आहे. पंत पहिल्या दिवशी दुखापतग्रस्त होता आणि आज त्याने यष्टिरक्षक म्हणून काम केले नाही. तत्पूर्वी यशस्वी जैस्वाल (१३), करुन नायर (४०) बाद झाले. केएल राहुल अर्धशतक झळकावून खेळत आहे. त्यामुळे ४१ षटकानंतर भारताची धावसंख्या ३ बाद १४४ धावा आहे





