जो बायडेन यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण म्हणाले,’राजकीय नेत्यांनी लवकर हार मानली त्यामुळेच…’

काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत.
या धुमश्चक्रीवेळी जागतिक स्तरावरून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र अगदी गल्लीपासून अमेरिकेपर्यंत अनेकविध देश आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन लष्कराला अफ- गाणिस्तानमधून परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आमच्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर निर्माण झाली, अशी कबुलीही बायडेन यांनी दिली.
ते पुढे म्हणाले,’ मी घेतलेल्या माझ्या निर्णयावर ठाम आहे. गेल्या २० वर्षांनंतरही
मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षात मला हे समजले आहे की, तेथून अमेरिकन लष्कर परत बोलवण्यासाठी योग्य अशी कोणतीच वेळ नव्हती. जेव्हा लष्कराला परत बोलावले गेले त्यावेळी आम्हाला या संघर्षाची जाणीव होती मात्र ही धुमश्चक्री अल्पावधीत घडल्या.
अफगाणिस्तानमधील राजकीय नेत्यांनी लवकर हार मानली आणि ते देश सोडून पळून गेले. त्यामुळेच अफगाणिस्तानचं लष्करही कोलमडलं’





