Joe biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोणाला म्हटले ‘हुकूमशहा’? ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वादाची ठिणगी

Joe biden : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात सुमारे चार तास चर्चा झाली, मात्र या भेटीचा कोणालाच फायदा झाला नाही. कारण या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बायडन यांनी, जिनपिंग हे हुकूमशहा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या वादाची ठिणगी पडली असल्याचे दिसत आहे. कारण बायडन यांनी जीनपिंग यांच्याविषयी बोलताना चीनचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन हे समोर बसून होते आणि त्यावेळी बायडन यांच्या वक्तव्यावर ते कमालीचे अस्वस्थ झाल्याची पहायला मिळत आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या चार तासांच्या बैठकीनंतर लगेचच शी जिनपिंग यांच्याबद्दल जो बायडेन यांनी केलेल्या वक्तव्याने एकच गोंधळ उडाला आहे.कारण सोनंही देशांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बायडेन यांना,”तुम्ही अजूनही शी जिनपिंग यांना हुकूमशहा मानतात का? असा सवाल करण्यात आला त्यावर बायडन यांनी हो ते नक्कीच हुकूमशाहचं आहेत.आपण कम्युनिस्ट देशाचे नेतृत्व करत जिनपिंग हे हुकूमशहा आहेत त्यासोबतच चीनचे सरकार अमेरिकेपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
Blinken’s face when Biden calls President Xi a dictator 🤣🤣🤣 pic.twitter.com/2sAPeGxwlZ
— Kim Dotcom (@KimDotcom) November 16, 2023
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये , जेव्हा बायडन शी जिनपिंगबद्दल बोलताना दिसत आहे, त्याचवेळी चीनचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन हे प्रचंड अस्वस्थ होताना दिसून येत आहेत. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ते बायडन यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे दिसत आहे.
अमेरिका आणि चीन आपसातील मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही टिप्पणी आली आहे. अशा स्थितीत बायडन यांनी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हटल्यानंतर चीनकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याआधी, दोन्ही नेत्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये बाली, इंडोनेशिया येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत प्रत्यक्ष भेट घेतली होती.





