Joe BIden-Prostate Cancer | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जो बायडेन यांना ‘प्रोस्टेट कर्करोगा’चे निदान झाले आहे. माजी राष्ट्रपतींना कर्करोगाचा एक अतिशय आक्रमक प्रकार आहे. तो त्यांच्या हाडांमध्ये पसरला आहे, असे सांगितले जात आहे. काल डेमोक्रॅट कार्यालयाने ही माहिती दिली. माध्यमांना दिलेल्या निवेदनात, “जो बायडेन यांना लघुशंकेशी संबंधित लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली, त्यानंतर त्यांना ‘प्रोस्टेट कर्करोग’ असल्याची पुष्टी झाली. आता बायडेनचे कुटुंब उपचारांच्या पर्यायांची योजना आखत आहे. दरम्यान, हा कर्करोग किती धोकादायक आहे आणि त्याचे उपचार काय आहेत? याविषयीची माहिती जाणून घेऊ… डेमोक्रॅटिक पक्षाने दिली ‘ही’ माहिती Joe BIden-Prostate Cancer | निवेदनानुसार, जो बायडेन ज्या प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त आहेत तो अत्यंत आक्रमक स्वरूपात आहे. मात्र, हा कर्करोग हार्मोन्सनाही संवेदनशील असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत, माजी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंब उपचारांच्या पर्यायांबद्दल त्यांच्या डॉक्टरांशी सतत बोलत आहेत. ८२ वर्षीय जो बायडेन यांचा मुलगा ब्यू बायडेन यांचे २०१५ मध्ये कर्करोगाने निधन झाले. निवेदनानुसार, बायडेन ज्या कर्करोगाशी झुंजत आहेत त्याचा ग्लीसन स्कोअर ९ आहे आणि ग्रेड ग्रुप ५ आहे. जो बायडेन किती धोकादायक कर्करोगाने ग्रस्त आहेत? अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, प्रोस्टेट कर्करोग हा अत्यंत असामान्य असल्याचे दिसून येते. त्याला सर्वोच्च रेटिंग ग्रेड ५ देण्यात आला आहे. त्याच वेळी, त्याचा ग्लीसन स्कोअर १० पर्यंत आहे. यावरून बायडेनच्या आजाराचे गांभीर्य दिसून येते. प्रोटेस्ट कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग Joe BIden-Prostate Cancer | अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, ‘प्रोटेस्ट कर्करोग’ हा पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. अमेरिकेतील दर आठ पुरूषांपैकी एकाला त्याच्या आयुष्यात या कर्करोगाचा त्रास होईल. जर सुरुवातीलाच हे लक्षात आले तर त्यावर उपचार करणे खूप सोपे आहे. तथापि, आकडेवारी असेही सांगते की कर्करोगामुळे जीव गमावणाऱ्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग हा मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. हेही वाचा युसूफ पठाणचा धक्कादायक निर्णय ; पाकचा पर्दाफाश करणाऱ्या संसदीय पथकासोबत जाण्यास नकार