युसूफ पठाणचा धक्कादायक निर्णय ; पाकचा पर्दाफाश करणाऱ्या संसदीय पथकासोबत जाण्यास नकार

Yusuf Pathan on Operation Sindoor। दहशतवाद्यांचे उगमस्थान असणाऱ्या पाकिस्तानवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, भारताने आता राजकीय राजनैतिक हल्ल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या देशांमध्ये संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची घोषणा केली आहे. या संसदीय पक्षात पश्चिम बंगालचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले.
शिष्टमंडळात समाविष्ट असणाऱ्या युसूफ पठाणने मोठा निर्णय घेत भारत सरकारला, आपण या दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाही. ” असे म्हटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,”पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या गटात युसूफ पठाण यांचा समावेश केला जाणार नाही. तसेच भारत सरकारने थेट खासदार युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता.
शिष्टमंडळासोबत परदेशात जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही Yusuf Pathan on Operation Sindoor।
खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांचे नाव समाविष्ट करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसशी कोणताही सल्लामसलत झाली नव्हती. भारत सरकारने थेट युसूफ पठाणशी संपर्क साधला होता आणि आता पठाणने भारत सरकारला कळवले आहे की शिष्टमंडळासोबत परदेशात जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही ” असे धक्कादायक उत्तर दिले आहे.
परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय – टीएमसी Yusuf Pathan on Operation Sindoor।
टीएमसीने परराष्ट्र धोरणाबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळातून युसूफ पठाण यांनी आपले नाव मागे घेतल्यानंतर, टीएमसीने म्हटले आहे की परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. हे उल्लेखनीय आहे की जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांतातील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.





