War Impact On India: आखातात नोकऱ्यांवर गंडांतर! भारतीयांना परत पाठवण्याची वेळ; $129 अब्ज रेमिटन्स धोक्यात?
War Impact On India: भारताचे संयुक्त अरब अमीरातीबरोबरच सौदी अरेबिया, कुवेत, कतार, ओमान, बहरीन इत्यादी देशांमध्ये लाखो कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वच कर्मचार्यांवर सध्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या परिणाम झाला आहे. हा परिणाम वाढत जाण्याची शक्यता आहे.

War Impact On India: आखातातील सर्वच देशात विशेषतः संयुक्त अरब अमिरातीमध्ये युद्धामुळे आदरातिथ्य, पर्यटन इत्यादी क्षेत्रात नोकर कपात सुरू झाली आहे. या भागात भारताचे एक कोटी नागरिक काम करतात. त्यामुळे वर्षाला या भागातून भारतात 129 अब्ज डॉलर येतात. या परकीय चलनातील उत्पन्नावर आता परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतातील कुशल कर्मचारी जगभरातील अनेक देशात महत्त्वाच्या पदावर काम करीत आहेत. त्यामुळे हे कर्मचारी मायदेशात डॉलरमध्ये पैसे पाठवीत असतात. यामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून 2024 मध्ये भारतात 129 अब्ज डॉलर आले. मेक्सिकोत 68 अब्ज डॉलर, चीनमध्ये 48 अब्ज डॉलर, फिलिपाईन्स मध्ये 40 अब्ज डॉलर, तर पाकिस्तान मध्ये 330 आले.
या रकमेमुळे भारताला आपली व्यापारातील तूट कमी करण्यात व चालू खाते वरील तूट कमी करण्यात यश मिळत आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणात परकीय गंगाजळी उपलब्ध असते. यातून भारताला खनिज तेल आणि इतर बाबी आयात करता येऊ शकतात. मात्र युद्धामुळे या समीकरणावर मोठा परिणाम झाला आहे.
आखेतातील बर्याच कंपन्यांनी आता कर्मचारी कपात सुरू केली आहे किंवा पगार कमी केले आहेत. तसेच ज्या कर्मचार्यांना काढून टाकले जात आहेत त्यांना मायदेशी परतण्यासाठी काही कंपन्या विमानाचे तिकीट आणि इतर सुविधा उपलब्ध करीत असल्याचे सांगितले जाते. या कंपन्यातील मनुष्यबळ व्यवस्थापकांची सध्या धावपळ चालू आहे. कर्मचारी कमी केले जात असल्यामुळे वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र एक महिना झाला तरी युद्ध संपण्याची कसलीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत हे मनुष्यबळ तिथे ठेवणे या कंपन्यांना जड जात आहे.
भारताचे संयुक्त अरब अमीरातीबरोबरच सौदी अरेबिया, कुवेत, कतार, ओमान, बहरीन इत्यादी देशांमध्ये लाखो कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वच कर्मचार्यांवर सध्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या परिणाम झाला आहे. हा परिणाम वाढत जाण्याची शक्यता आहे.





