PNG Usage increased: आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंपाकासाठी पीएनजीचा म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅसचा वापर करावा यासाठी प्रयत्न करीत आहे. याला नागरिक चांगला प्रतिसाद देत असून मार्च महिन्यामध्ये पीएनजी साठी 2.7 लाख नवी कनेक्शन देण्यात आल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केली आहे. लिक्विडीफाईड पेट्रोलियम गॅसपेक्षा पीएनजीचा वापर अधिक सोयीचा आहे. नागरिकांना पीएनजीसाठी नोंदणी करावी लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही. त्यामुळे अमेरिका- इराण युद्ध सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने पीएनजीचा वापर नागरिकांनी करावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. मार्च महिन्याअगोदरच पीएनजीसाठी नोंदणी केलेल्या 3.1 लाख ग्राहकांना पीएनजी पुरविण्यात आला आहे. त्यामध्ये घरगुती वापराशिवाय व्यावसायिक वापर, होस्टेल, मेस, कॅन्टीन इत्यादींचा समावेश आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने मार्च महिन्यामध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी पीएनजीचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले. या माध्यमातून नव्या 2.7 लाख ग्राहकांनी पीएनजीचा स्वीकार केला याबद्दल सरकारने समाधान व्यक्त केले आहे. हेही वाचा – India Growth Rate: युद्ध लांबल्यास भारताला मोठा धक्का? विकास दर घटणार, महागाई गगनाला भिडणार! युद्ध सुरु होण्यापूर्वीच भारत सरकारने जास्तीत जास्त नागरिकांनी पीएनजीचा वापर करावा यासाठी एक मोहीम सुरू केली होती. ही मोहीम जूनपर्यंत चालणार आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषता गॅसचा जास्त वापर करणार्या व्यवसायिक संस्थांनी पीएनजीचा वापर करावा असा यामागे सरकारचा दृष्टिकोन आहे. कारण यामुळे गॅस वापर करणार्यांना सिलेंडर बदलण्याची त्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. पीएनजी अहोरात्र उपलब्ध केला जातो आणि मीटर रीडिंग नुसार बिल आकारले जाते. हे पेट्रोलियम कंपन्यासाठी सोयीचे आहे. त्याचबरोबर नागरिकांसाठी सोयीचा आहे. सिलेंडरचा खर्च, वाहतूक इत्यादी कमी होते. त्यामुळे पीएनजी जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जावा असा सरकारचा दृष्टिकोन आहे