Satara | उंब्रजमध्ये आज रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना,युवक युवतींना तसेच दहावी ते पदव्युतर,आय.टी.आय., इंजिनअर अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी यासाठी 21 ऑगस्टला बुधवारी उंब्रज ता.कराड येथे जिल्हा कौशल्य, विकास,
रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि ज्ञानसेवा प्रबोधिनी सामाजिक संस्था पुसेसावळी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. मेळाव्यात नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे व भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील, रहिमतपूर मंडल महिला मोर्चा अध्यक्षा अंजली जाधव, कराड उत्तर मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सीमा घार्गे उपस्थित असतील.
नामवंत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना लगेचच नियुक्तिपत्र देण्यात येणार आहेत.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या कर्ज योजनांचा लाभ देखील देण्यात येणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेतून आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.
या मेळाव्यात युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी देण्यात येईल या रोजगार मेळाव्यात हिंजवडी, पुणे, सातारा, सोलापूर येथील नामवंत कंपन्याच्या अधिकऱ्यांकडून इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे.
रोजगार मेळाव्याचा मुख्य हेतू बेरोजगार युवकांना किंवा जे युवक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळवून देणे हा आहे.
सध्या उंब्रज येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे भविष्यात पुसेसावळी, मसूर, नागठाणे, ओगलेवाडी या ठिकाणी देखील अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमाने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक युवकांना रोजगार प्राप्ती होणार आहे.





