जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा यांचा ‘जोकर 2’ बॉक्स ऑफिसवर वेळेआधीच धडकणार

हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘जोकर’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘जोकर: फोली अ ड्यूक्स’च्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे, वॉर्नर ब्रदर्स इंडियाने खुलासा केला आहे की हा चित्रपट शेड्यूलच्या दोन दिवस अगोदर बुधवारी, 2 ऑक्टोबर 2024 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. यात जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा मुख्य भूमिकेत आहेत.
‘जोकर: फोली अ ड्यूक्स’ चे दिग्दर्शन टॉड फिलिप्स यांनी केले आहे. आर्थर फ्लेकचे ऑस्कर विजेते पात्र जोक्विन फिनिक्सने साकारले आहे. ‘जोकर: फोली अ ड्यूक्स’मध्ये लेडी गागालाही मुख्य भूमिकेत झळकवण्यात आली असून ती या सिक्वलमध्ये आर्थरला पूर्णपणे सपोर्ट करणार आहे, पण कथेत काय ट्विस्ट असेल, हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल. चित्रपट पहिला भाग 2019 मध्ये रिलीज झाला होता.
2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती भारतात साजरी केली जात असल्याने आणि या दिवशी सुट्टी आहे. अशा परिस्थितीत सहसा थिएटरमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. या निर्णयामुळे ‘जोकर: फोली अ ड्यूक्स’ला बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठ्या रिलीजंपैकी एक आहे.
4 ऑक्टोबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात ऑस्कर नामांकित ब्रेंडन ग्लीसन, ‘द बॅन्शीज ऑफ इनिशेरिन’ फेम आणि कॅथरीन केनर, ज्या ‘गेट आऊट’ मध्ये दिसल्या होत्या. हा चित्रपट 4 ऑक्टोबर 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.





