JNPT Port Blast : उरण नजीकच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) क्षेत्रातील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमध्ये आज दुपारी एक अत्यंत थरारक आणि भीषण दुर्घटना (JNPT Port Blast) घडली. येथील एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली आहे. एकापाठोपाठ झालेल्या तीन स्फोटांनी (JNPT Port Blast) संपूर्ण परिसर हादरून गेला.या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी कामाची लगबग सुरू असताना अचानक केमिकल प्लांटमध्ये पहिला स्फोट झाला. त्यापाठोपाठ अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने आणखी दोन स्फोट झाले. JNPT Port Blast या स्फोटांची (JNPT Port Blast) तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. रसायनांच्या ज्वलनामुळे आकाशात काळ्याकुट्ट धुराचे लोट उसळले असून, हे दृश्य कित्येक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहे. या धुरामुळे परिसरात श्वास घेण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. केमिकल प्लांट असल्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा तसेच विशेष फोमचा वापर करण्यात येत आहे. लॉजिस्टिक पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने आग अधिक पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.