JMM-Congress Alliance। झारखंड सरकारमध्ये मोठ्या उलथापालथीच्या अटकळी असताना, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या सहकाऱ्याकडून एक मोठे विधान आले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस युती तुटल्याच्या अटकळींना पूर्णविराम देत, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते मनोज पांडे यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे. मनोज पांडे यांनी,” हेमंत सोरेन यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. युती तुटण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. युती तुटेल तरी का ? असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला आहे. हेमंत सोरेन दिल्लीला का गेले? JMM-Congress Alliance। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्ली भेटीभोवती सुरू असलेल्या राजकीय अटकळींवर झामुमो नेते मनोज पांडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “हेमंत सोरेन वैयक्तिक कारणांसाठी दिल्लीला गेले होते. असे पांडे यांनी सांगितले. तसेच “झारखंडबद्दल अनावश्यक अंदाज बांधले जात आहे. झारखंड सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांच्या दिल्ली भेटीबाबत अंदाज लावला गेला होता कि, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख भाजप हायकमांडला भेटण्यासाठी तिथे गेले होते. या अटकळीमुळे आगामी निवडणुकीत झामुमो आणि भाजप यांच्यात संगनमत असल्याची चर्चा सुरू झाली. काँग्रेसची प्रतिक्रिया काय होती? या प्रकरणाबाबत काँग्रेसच्या एका नेत्याला विचारण्यात आले तेव्हा, प्रदेश प्रवक्ते राकेश सिन्हा यांनी या अटकळी निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. ते म्हणाले की, “झामुमो आणि भाजप युती करू शकतात असे ज्यांना वाटते ते चुकीचे आहेत. भाजपवर आरोप करताना राकेश सिन्हा यांनी, “झारखंडमधील आमदारांचे मनोधैर्य खचविण्यासाठी भाजपकडूनच या अफवा पसरवल्या जात आहेत. या गोष्टींना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पुरावे नाहीत” असाही दावा केला. तसेच काँग्रेस नेत्याने असाही दावा केला की, झारखंडमध्ये इंडिया अलायन्स मजबूत आहे आणि हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे मंत्री झारखंडच्या विकासासाठी काम करत राहतील. भाजपकडूनही चर्चांचे खंडन हेमंत सोरेन आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीबद्दलच्या अशा अटकळींना केवळ झामुमो आणि काँग्रेसच नाही तर भाजप स्वतःही निराधार म्हणत आहे. भाजप नेत्याने म्हटले की, झामुमो आणि भाजप हे समुद्राच्या दोन बाजूंसारखे आहेत आणि ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. हेमंत सोरेन यांचा दिल्ली दौरा भाजप नेत्यांना भेटण्यासाठी नव्हता. ते दिल्लीला का गेले हे फक्त तेच सांगू शकतात.