‘जेव्हा बांगलादेशात हिंदूंची हत्या होते, तेव्हा…’, मेहबुबा मुफ्तींनी प्रचार थांबवला, भाजप नेते म्हणाले,’हे मगरीचे अश्रू..’

JK Elections । इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाहला ठार केले आहे. हिजबुल्ला प्रमुखाच्या मृत्यूवर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रविवारी त्यांनी आपला निवडणूक प्रचारही एक दिवसासाठी थांबवला आहे. यावरून आता भाजपने मेहबुबा मुफ्तींवर निशाणा साधला आहे.
JK Elections । भाजपने मेहबुबा मुफ्तींवर निशाणा साधला
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते कविंदर गुप्ता म्हणाले, “हसन नसराल्लाह यांच्या निधनाने मेहबुबा मुफ्ती दुःखी का आहेत? बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होऊन त्यांची हत्या झाली तेव्हा त्या गप्प राहिल्या नाही. हे मगरीचे अश्रू आहेत आणि त्यामागील हेतू लोकांना समजतो.”
JK Elections । हा केवळ निवडणुकीचा स्टंट आहे – भाजप नेते अल्ताफ ठाकूर
भाजप नेते अल्ताफ ठाकूर यांनीही मेहबूबा मुफ्तींवर निशाणा साधला आहे. अल्ताफ ठाकूर म्हणाले की, ‘जगात कुठेही युद्ध होऊ नये. त्यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्यावर आरोप करत त्या धार्मिक कार्ड खेळत असून हा केवळ निवडणुकीचा स्टंट असल्याचे सांगितले.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसराल्लाह यांच्या निधनावर पोस्ट लिहिली. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांसोबत उभे आहोत. केवळ मुफ्तीच नाही तर जम्मू-काश्मीर अंजुमन-ए-शरीचे अध्यक्ष शिया आगा सय्यद हसन मोसवी अल सफवी यांनीही नसरल्लाह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.





