JK Election Result 2024 : ‘जम्मू-काश्मीर’च्या निकालावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Jammu and Kashmir Election Results 2024 । Devendra Fadnavis – जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. विधानसभेच्या 90 पैकी 84 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, एनसीने 39 जागा जिंकल्या आहेत, तर त्यांचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत. भाजपने 27 जागा जिंकल्या आहे, तर पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, भाजपच्या एकाही मुस्लिम उमेदवाराला विजय मिळाला नाही.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या कामगिरीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “जम्मू-काश्मीरमधील भाजपाचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला आहे. प्रचंड मतदान झालं. पाकिस्तानचा प्रपोगंडा संपुष्टात आला.
उत्साहवर्धक…
जम्मू-काश्मीरचा निकाल भारतातील लोकशाहीची मजबूती अधोरेखित करणारा!(माध्यमांशी संवाद | सोलापूर | 8-10-2024)@BJP4India @BJP4JnK#AssemblyElection2024 #HaryanaAssemblyElection2024 pic.twitter.com/ehuldQiuFR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2024
निष्पक्ष निवडणुका होतात हे दाखवून दिलं. ही निवडणूक म्हणजे पाकिस्तानला चपराक आहे. 370 हटवल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील असं म्हणायचे, रक्ताच्या नद्या सोडा, लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले. जम्मू-काश्मीरमध्ये लोकाशाही लोकनियुक्त सरकार सत्तेवर येणार आहे’. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.





