जितेंद्र आव्हाडांना राहवेना.! ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमावरील नव्या वादात मारली उडी; ट्विट चर्चेत…

मुंबई – “द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमाने अधिराज्य गाजवले आहे. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. मात्र, आता पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे.
नुकतंच गोव्यात 53वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरु होता यावेळी अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये इफ्फी पुरस्काराचं वितरण होतं. तसेच अनेक सिनेमाचं स्क्रिनिंग केलं जातं होत. अश्यातच, ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना काश्मीर फाइल्स सिनेमावर चांगलाच निशाणा साधला आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशलवर व्हायरल होत आहे.
ते म्हणाले, “इफ्फी महोत्सवातील 15वा सिनेमा होता द काश्मीर फाईल्स . पण हा सिनेमा पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळे अस्वस्थ झालो. हा सिनेमा एका विशिष्ट प्रोपगंडा असलेला आणि वल्गर आहे. इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमाला स्थान मिळालं हे अयोग्य आहे’.
तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी “काश्मीर फाईल्स” चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली. pic.twitter.com/LE8djvDcce
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 29, 2022
लॅपिड यांच्या या विधानाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तर अनेकांनी लॅपिड यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सध्या याच विधानावरून राज्याच्या राजकारणात नवीन मुद्दा तोंड वर काढताना दिसत आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणावर ट्वीटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी “काश्मीर फाईल्स” चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली’ या आशयाचे ट्विट आव्हाडांनी केलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.





