Jitendra Awhad : विनोद तावडेंना हॉटेलमध्ये घेरलय; जितेंद्र आव्हाड म्हणतात, “रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर…’

Jitendra Awhad | Vinod Tawde : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. आव्हाड म्हणाले की, “माझं निवडणूक आयोग, पोलिसांना स्पष्ट सांगणं आहे की, बाहेरची लोक मतदारसंघात येऊन काय करतात?
त्यांना मतदारसंघाची काय माहिती आहे? माझ्या इथे डोंगर आहेत, अंधाऱ्या गल्ल्या आहेत. उद्या आतमध्ये एखादा अनोळखी माणूस घुसला. चोर म्हणून लोकांनी त्याला चोपलं तो मेला मग काय करायचं?” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘नाकेबंदी नाही, कोणीही येतं, कुठेही घुसतं, आम्ही व्हिडिओ दाखवला दारुच्या बाटल्या नेतानाच. पोलीस म्हणतात, त्या पाण्याच्या बाटल्या असू शकतात. पोलिसांना हे माहित नाही की, खाकी बॉक्समधून कधीही पाण्याच्या बाटल्या जात नाहीत, खाकी बॉक्समधूनच दारुच्या बाटल्या नेल्या जातात. पोलिसांनी पोलीस गणवेश सोडून पक्षाचा गणवेश घालावा असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘भाजपचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी पाच कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत?
भाजपचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत?… pic.twitter.com/d0sigpEajY
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2024
अडीच तास उलटूनही कोणतीच कारवाई का झालेली नाही? राज्यात सत्ता आणि पैशाचा माज चालु आहे. जनता हे उघड्या डोळ्यांनी बघतेय. उद्या मतदानाच्या दिवशी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय लोक स्वस्थ बसणार नाहीत..! असं देखील ते म्हणाले आहेत.





