मुंबई – भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहे. यानंतर याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या व्हिडीओवरून जोरदार शाब्दिक हल्ले चढवले.
बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे! https://t.co/HGWmZunrRo
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 18, 2023
यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. तसेच व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे, या प्रकाराचा निषेध करतो, असं आव्हाडांनी म्हटलं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे यावेळी तिने सोमय्यांबाबतचा एक अनुभवाला सांगितला.
नताशा आव्हाड म्हणाली, “बाबा,जेव्हा तुम्ही कोविडमध्ये गंभीर आजारी होता, तेव्हा हेच किरीट सोमय्या तुम्ही आजारी नाहीतच, नाटक करत आहात असे खोटे आरोप करत होते. तसेच तुम्ही आजारी असल्याचा पुरावा मागत होते. तेव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीट सोमय्यांच्या खासगी आयुष्याच्या हक्कांसाठी तुम्ही उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे.”असं म्हणत तिने अनुभव सांगितला आहे.
दरम्यान, सोमय्या यांचा सोमवारी (दि.17) अश्लील व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने दाखविल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. दुसरीकडे इतर नेत्यांवर वारंवार आरोप करण्याची ख्याती असलेल्या सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, तेही विरोधकांच्या रडारवर आले आहेत.