Jishnu Dev Varma : विद्यापीठांनी स्कूल-कनेक्ट, स्वयंसिद्धा उपक्रम राबवा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आदेश
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच सर्व कुलगुरूंशी संवाद साधला.

Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच सर्व कुलगुरूंशी संवाद साधला. लोकभवन येथून झालेल्या या दृकश्राव्य बैठकीत त्यांनी विद्यापीठांना शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या.
राज्यपालांनी (Jishnu Dev Varma) प्रामुख्याने स्कूल-कनेक्ट आणि स्वयंसिद्धा या दोन उपक्रमांवर भर दिला.
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी विद्यापीठांनी थेट शाळांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना प्रेरित करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच, महिलांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला स्वयंसिद्धा हा कौशल्य विकास उपक्रम गांभीर्याने राबवण्याचे आदेश दिले.
विद्यापीठांनी आपले राष्ट्रीय मानांकन सुधारण्यासाठी वेळोवेळी लक्ष निर्धारित करावे तसेच दोन्ही उपक्रमांच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल नियमितपणे लोकभवन येथे सादर करणे अनिवार्य असल्याचे देखील राज्यपालांनी (Jishnu Dev Varma) स्पष्ट केले.
याबरोबरीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठांना पदक किंवा चषक देऊन गौरवण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्या विद्यापीठांचे प्रयोग यशस्वी ठरतील, ते उपक्रम इतर विद्यापीठांमध्येही राबवले जातील, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.






