मस्तच! अवघ्या 699 रुपयात मिळतोय जिओचा फोन, फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा डिटेल्स

JioBharat K1 Karbonn 4G | भारतीय बाजारात स्मार्टफोनची विक्री वाढली असली तरी आजही फीचर फोन वापरणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तुम्ही देखील नवीन फीचर फोन शोधत असाल तर JioBharat K1 Karbonn 4G चा विचार करू शकता. जिओच्या या फीचर फोनची किंमत कमी झाली आहे.
JioBharat K1 Karbonn 4G कीपॅड फीचर फोन आता फक्त 699 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत फोनच्या ब्लॅक आणि ग्रे व्हेरिएंटसाठी आहे. तर, या कीपॅड फोनचे ब्लॅक आणि रेड कलर व्हेरिएंट Amazon वर 939 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनला JioMart वरूनही खरेदी करता येईल.
JioBharat K1 Karbonn 4G चे फीचर्स
JioBharat K1 Karbonn 4G कीपॅड फोनमध्ये 1.77 इंच डिस्प्ले दिला असून, जो 720 पिक्सल रिझोल्यूशनसह येतो. यामध्ये 0.05GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोन फक्त जिओ-लॉक्ड सिंगल नॅनो सिम सपोर्टसह येतो.
जिओच्या या फोनमध्ये 1000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करतो. यात तुम्ही जिओ टीव्ही, जिओ साउंड पे आणि JioSaavn सोबत जिओ पेचाही वापर करू शकता. फोनमध्ये एक कॅमेराही दिला आहे. याशिवाय, फीचर फोन एकूण 23 भाषांना सपोर्ट करतो. यामध्ये एफएम रेडियो सपोर्टही उपलब्ध आहे.
JioBharat V3 4G
जिओच्या या फोनला Amazon वरून फक्त 799 रुपयात खरेदी करता येईल. यामध्ये 1.8 इंच डिस्प्ले, 0.13GB स्टोरेज, Threadx RTOS ऑपरेटिंग सिस्टिम, लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि यूपीआय पेमेंट फीचर मिळेल. हा फोन केवळ जिओ नेटवर्कला सपोर्ट करतो.





