Jio vs Airtel vs Vi : 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम प्लॅन्स, महिनाभर वैधतेसह मिळेल डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

Jio vs Airtel vs Vi Best Recharge Plans : Jio, Airtel आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅन्सच्या वाढत्या किंमतीमुळे भारतीय ग्राहक वैतागले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून स्वस्त रिचार्ज प्लॅन्सला प्राधान्य दिले जाते. या तिन्ही कंपन्यांकडे 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे काही शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कमी किंमतीत येणाऱ्या Jio, Airtel आणि Vi च्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Jio चा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा मिळते. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, JioTV, JioCinema आणि JioCloud चा अॅक्सेस देखील दिला जातो. काही यूजर्सला प्लॅन अंतर्गत अनलिमिटेड 5जी डेटाचाही फायदा मिळतो.
Jio चा 259 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण एक महिन्यासाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएसचाही फायदा मिळेल. जिओ यूजर्सला प्लॅन अंतर्गत JioTV, JioCinema आणि JioCloud चा अॅक्सेस देखील मिळेल.
Airtel चा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलकडेही जिओप्रमाणे 299 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज मोफत 100 एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, Apollo 24/7, फ्री हॅलो ट्यून्स आणि Wynk Music चा मोफत अॅक्सेस मिळतो.
Vi चा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
व्हीआयच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय, यूजर्सला 3जीबी अतिरिक्त डेटा, Vi movies & live TV चे सबस्क्रिप्शन, विकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाइट सारखे फायदे मिळतील.
Vi चा 296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Vi च्या 296 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1जीबी डेटा, 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय, Vi movies & live TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले आहेत. Vi च्या या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.





