आणखी एक रेल्वे रुळावरून घसरली ; हावडा-मुंबई एक्स्प्रेस झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये मोठा अपघात, अनेक जण जखमी

Jharkhand Train Derailment । झारखंडमधील चक्रधरपूरमध्ये आज पहाटे रेल्वे अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस चक्रधरपूरजवळ रुळावरून घसरली. या अपघातात 6 जण जखमी झाल्याचेसांगण्यात येतंय. घटनेत सहभागी लोकोमोटिव्हची संख्या 37077 आहे.
प्राप्त माहितीनुसार, “हा रेल्वे अपघात राजखर्सवान वेस्ट आऊटर आणि बारांबू स्थानकांदरम्यान पहाटे ४.०० वाजता झाला. रेल्वेच्या वैद्यकीय पथकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. ARME सोबत कर्मचारी आणि ADRM CKP घटनास्थळी उपस्थित आहेत. सर्व जखमींवर भारतीय रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले आहेत.
अपघाताचे कारण अस्पष्ट Jharkhand Train Derailment ।
झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये झालेल्या या रेल्वे अपघाताची छायाचित्रेही समोर आली आहेत. हा अपघात भीषण असल्याचे फोटोत दिसत आहे. याचे कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एक्स्प्रेस ट्रेनचा अपघात झाला तेव्हा बाजूच्या रुळावर एक मालगाडी उभी होती. रुळावरून घसरलेल्या बोगी त्याच मालगाडीला धडकल्या.
एअर ॲम्ब्युलन्सही घटनास्थळी दाखल Jharkhand Train Derailment ।
जखमींना बाहेर काढून एअर ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात येत आहे. आनंदाची बाब म्हणजे या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा
केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती





