केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती

Kerala News | केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दोनच्या सुमारास दरड कोसळली. यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास आणखी एक दरड कोसळली. भूस्खलनामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
Horrible visuals of landslide coming in from Meppadi, Wayanad.#Wayanad #Landslide #Kerala pic.twitter.com/4DHZYV7Ciu
— West Coast Weatherman (@RainTracker) July 30, 2024
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) सांगितले की, बचाव कार्यासाठी अनेक पथके बाधित भागात पाठवण्यात आली आहेत. एनडीआरएफची अतिरिक्त टीम वायनाडला जाणार आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. याशिवाय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एक एएलएच, बचाव कार्यासाठी सुलूर येथून रवाना होतील. Kerala News |
हेल्पलाइन नंबर जारी Kerala News |
क्षेत्राच्या सीएमओनुसार, आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियानाने एक नियंत्रण कक्ष उघडला आहे आणि आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 9656938689 आणि 8086010833 जारी केले आहेत.
Kerala: Landslide occurs in Wayanad following heavy rainfall. Health Department – National Health Mission has opened a control room and issued helpline numbers 9656938689 and 8086010833 for emergency assistance. Two Air Force helicopters Mi-17 and an ALH will depart from Sulur…
— ANI (@ANI) July 30, 2024
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी एका निवेदनात सांगितले की, वायनाडमधील भूस्खलनानंतरबचाव कार्य वेगाने सुरू आहे. जेव्हापासून आम्हाला या घटनेची माहिती मिळाली तेव्हापासून सरकारी यंत्रणा बचावकार्यात सहभागी झाली आहे. तसेच मंत्री वायनाडला भेट देतील आणि तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतील. Kerala News |
हेही वाचा:
पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी ; टीएलपीच्या मौलानाला अटक, सरकार काय म्हणाले?




