Jharkhand News : झारखंडमध्ये जमिनीच्या वादातून कॉंग्रेस नेत्यावर गोळीबार
Updated On:

Jharkhand News – झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एका वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यावर काही लोकांनी गोळीबार केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. प्रकाश असे त्यांचे नाव असून ते झारखंड प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे सरचिटणीस आहेत.
ते शुक्रवारी संध्याकाळी कोर्रा भागातील कॅनरी हिल रोड येथे त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या तुकड्यावरील बांधकामाची पहाणी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
तेथील भूमाफिया अशोक साओ याच्या नेतृत्वाखालील काही लोकांशी त्यांचा वाद झाला, त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, असे पोलिसांनी सांगितले.
प्रकाश यांना रांची येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी अशोक साओला अटक केली असली तरी त्याचे पाच साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.





