Jharkhand Elections 2024 : झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे जोरदार कमबॅक, भाजपला जोरदार धक्का….

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीच्या हेमंत सोरेन यांचा झामुमो पुन्हा सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना झारखंडमध्ये मात्र भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेच्या 81 जागांचे निकाल लागले असून झामुमु युतीने (JMM 34, काँग्रेस 16, CPI-M 2 आणि RJD 4 ) एकूण 56 जागा मिळवून दमदार विजय मिळवला आहे तर दुसरकीकडे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने (भाजप 21 जागा आणि AJSUP 01, LJPRV 01, JLKM 01 आणि JD-U 01 ) एकूण 25 जागा जिंकल्या आहेत.
विजयानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या मुलांचा फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, “माझी ताकद.” दरम्यान त्यांच्या पत्नी कल्पना गांडेय यांनी 12 हजार मतांनी पिछाडीवर पडूनही विजय मिळवला आहे.
मेरी शक्ति pic.twitter.com/6NP6O6Vl7R
— Hemant Soren (@HemantSorenJMM) November 23, 2024
13 आणि 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 81 जागांवर मतदान झाले असून 68 टक्के मतदान झाले आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमने 30, काँग्रेस 16 आणि आरजेडीने एक जागा जिंकली होती. तिन्ही पक्षांची युती होती. त्यानंतर झामुमोचे नेते हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या.
समस्त झारखण्डवासियों को जोहार,
आइए, साथ चलकर हम सोना झारखण्ड के निर्माण का संकल्प लें।
जय संविधान!
जय लोकतंत्र!जय झारखण्ड! pic.twitter.com/0uwet4t90f
— Hemant Soren (@HemantSorenJMM) November 23, 2024
चंपाई सोरेनही विजयी
माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सरायकेलामधून निवडणूक जिंकली. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. धनवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबू लाल मरांडी हे निवडणुकीत विजयी झाले आहेत. हेमंत सरकारचे चार मंत्री दीपिका पांडे सिंग, बन्ना गुप्ता, हाफिझुल हसन अन्सारी, बेबी देवी आणि मिथिलेश ठाकूर पिछाडीवर होते.
प्रियंका गांधी यांचा संसद प्रवेश निश्चित; वायनाडमध्ये 4 लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी
झारखंड निकाल
एकूण जागा-८१ (बहुमत-४१)
झामुमु युती- ५६
भाजप- २५



