Jejuri News: जेजुरीच्या विकासासाठी ४ कोटींचा बूस्टर डोस! नगराध्यक्ष जयदीप बारभाईंकडून विविध कामांचा धडाका
Jejuri News: दलित वस्ती सुधार योजना आणि नमो उद्यान प्रकल्पाचा शुभारंभ; जेजुरीतील जुन्या पालखी मैदानासह विविध भागांत होणार हायटेक विकास.

Jejuri News – जेजुरीवासीयांनी विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक प्रभागात रस्ते, वीज, पाणी, भुयारी गटार, शहर सुशोभीकरण आदी नागरी सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेत विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत. यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून विविध योजनांतील फंडातून पुढील काळात भरघोस निधी मिळवून कामे मार्गी लागतील,
असे जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितले. तसेच, आमदार शिवतारे यांच्या प्रयत्नामुळे मांडकी डोहावरील जुनी पाणीपुरवठा योजना येत्या महिन्यात कार्यान्वित होईल, तर वीर जलयोजनेचे काम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शनिवारी (दि. ४) शहरातील विविध प्रभागातील सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
भूमिपजून करण्यात आलेल्या कामांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जुनी जेजुरी येथे रस्ते काँक्रीटीकरण, गटार लाइन, आझाद चौक, लक्ष्मीनगर येथे पथदिवे बसविणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, जुने पालखी मैदान येथे नमो उद्यान विकसित करणे, लक्ष्मीमंदिर नजिक समाज मंदिर आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्यासह शिवसेना नेत्या डॉ. ममता शिवतारे-लांडे, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश निकुडे,
नगरसेवक अस्लम पानसरे, योगेश जगताप, कृष्णा कुदळे, शिवाजी जगताप, स्वप्नील हरपळे, रोहित खोमणे, समीर मोरे, नगरसेविका अमिना पानसरे, मंदा बयास, प्रज्ञा राऊत, भक्ती कोरपड, मेघा उबाळे, स्नेहल भालेराव, योगिता दोडके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रमेश लेंडे, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, रमेश बयास, सुशील राऊत, सत्यवान उबाळे, माजी विश्वस्त संदीप जगताप आदींसह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





