प्रभात वृत्तसेवा जवळार्जुन – जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून जयदीप दिलीप बारभाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विरोधकांना कडवे आव्हान दिले आहे. त्यामुळे जेजुरीनगरीत अटीतटीची आणि लक्षवेधी लढत होणार आहे.नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून जयदीप दिलीप बारभाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभागा मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक जालिंदर कामठे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, वामन जगताप, शांताराम कापरे, जिल्हा युवक अध्यक्ष अमित झेंड, रोहिदास कुंभार, एनडी जगताप, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जयदीप बारभाई यांना राजकीय वारसा आहे. माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांचे जेजुरीत मोठे राजकीय प्रस्थ आहे. दिलीप बारभाई हे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. जेजुरी पालिकेवर २८ वर्षे त्यांनी नगराध्यक्षपदी काम केले आहे. त्यामुळे वडीलाच्या राजकीय कारकिर्दीचा व राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा त्यांना निश्चितच फायदा होणार आहे. जेजुरी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही होणार आहे. जेजुरी हे शहर अठरापगड जाती धर्माच्या नागरिकांचे शहर आहे. राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करावे लागते. त्यामुळे मी जेजुरी पालिकेच्या या निवडणुकीत मतदार मला साथ देणार आहेत, असा विश्वास जयदीप बारभाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जयदीप बारभाई यांचे तगडे आव्हान नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) कडून सर्वसमावेशक व प्रबळ उमेदवार म्हणून जयदीप बारभाई यांचे नाव आघाडीवर आहे. जेजुरीच्या राजकारणात बारभाई यांच्या कुटुंबाचे मोठे प्रस्थ आहे. मागील पाच वर्षांत जयदीप बारभाई यांनी तळागाळात सामाजिक कार्य करीत संघटनात्मक फळी मजबूत आहेत. मागील निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांच्या गटाची सत्ता होती. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.