पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जनता दल युनायटेड (JDU) ने एक महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून JDU ने 4 माजी आमदारांसह 11 नेत्यांना पक्षातून निष्कासित केले आहे. या कारवाईमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. कोण आहेत हे निष्कासित नेते? माजी मंत्री – शैलेश कुमार माजी विधान परिषद सदस्य – संजय प्रसाद आणि रणविजय सिंह माजी आमदार – श्याम बहादुर सिंह आणि सुदर्शन कुमार इतर नेते – अमर कुमार सिंह, महुआ येथील JDU उमेदवार राहिलेल्या आस्मां परवीन, लव कुमार, आशा सुमन, दिव्यांशु भारद्वाज आणि विवेक शुक्ला. बिहार विधानसभा निवडणूक कधी? पहिला टप्पा: 6 नोव्हेंबर दुसरा टप्पा: 11 नोव्हेंबर निकाल: 14 नोव्हेंबर या निवडणुकीत मुख्य लढत NDA आणि महागठबंधन यांच्यात असली तरी ‘जनसुराज’ हा नवा पक्षही जोरदार टक्कर देत आहे. सर्वच पक्षांनी प्रचारावर जोर दिला असून वातावरण तापले आहे. ‘बिहार प्रगतीचे नवे आयाम स्थापित करत आहे’ – मुख्यमंत्री नितीश कुमार ज्या दिवशी पक्षाने निष्कासनाची कारवाई केली, त्याच दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बक्सर जिल्ह्यातील डुमरांव आणि पाटणा जिल्ह्यातील फुलवारीशरीफच्या रामकृष्णा नगर येथे NDA उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी नितीश कुमार म्हणाले की, “आम्ही समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी काम केले आहे. राज्यात प्रेम, बंधुता आणि शांततेचे वातावरण आहे. गेली 20 वर्षे विकासकामांमध्ये सातत्याने गुंतून राहिल्यामुळेच आज बिहार प्रगतीचे नवे आयाम स्थापित करत आहे. येणाऱ्या काळात बिहार देशातील सर्वात विकसित राज्यांपैकी एक असेल.”