Jayprakash Majumdar : तृणमूल काँग्रेसचे नेते जयप्रकाश मुजुमदार यांना जामीन मंजूर
एका अपार्टमेंटचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याच्या आरोपाखाली अटक झालेले तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते जयप्रकाश मुजुमदार (Jayprakash Majumdar) यांना बुधवारी कलकत्ता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Jayprakash Majumdar : एका अपार्टमेंटचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याच्या आरोपाखाली अटक झालेले तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते जयप्रकाश मुजुमदार (Jayprakash Majumdar) यांना बुधवारी कलकत्ता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. अटक झाल्यापासून जवळपास एका महिन्याने त्यांना हा दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती अजय कुमार मुखर्जी यांनी मजुमदार यांना जामीन देताना काही अटी घातल्या आहेत. तपासात पूर्ण सहकार्य करणे आणि प्रकरणातील साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे किंवा त्यांना न धमकावणे या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला.
सॉल्ट लेक येथील एका फ्लॅटचा अनेक वर्षांपासून बेकायदेशीर ताबा घेतल्याच्या आणि जागा रिकामी करण्यास सांगितल्यावर मालकाला धमकावल्याच्या तक्रारीवरून मजुमदार (Jayprakash Majumdar) यांना ३ जून रोजी अटक करण्यात आली होती.
फ्लॅट मालकाच्या आरोपानुसार, मजुमदार यांनी २०१४ मध्ये हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. मात्र, वारंवार विनंती करूनही त्यांनी ताबा सोडला नाही आणि भाडे मागितल्यास धमक्या दिल्या. दरम्यान, ५ जून रोजी तपासासाठी पोलीस मुजुमदार (Jayprakash Majumdar) यांना संबंधित फ्लॅटवर घेऊन गेले असता, संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर अंडी फेकून तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.






