Jaykumar Gore – शहरात साकार होत असलेल्या वेदासिटी टाऊन प्लॅनिंग स्कीम फेज 1 मध्ये ए विंग शंकर हाईट्स व बी विंग माधव हाईट्स हे गृहनिर्माण प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरतील, असे मत पंचायत राज व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.याप्रसंगी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, पोलीस उप अधीक्षक रणजित सावंत, वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, जिल्हा नियोजन समितीचे संचालक बंडा गोडसे, हिंदुराव गोडसे, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी, वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण, नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, जि. प. सदस्य धनंजय चव्हाण, पं. स. सदस्य हनुमंत बोटे, माजी तालुकाध्यक्ष विकल्प शहा, नगरसेवक उपस्थित होते. मंत्री जयकुमार गोरे व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या गृहनिर्माण प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. ना.गोरे म्हणाले, वडूज शहरातील या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी प्रथमच शासनाकडून या प्रकल्पांसाठी भरघोस निधी देण्यात आला असून आतापर्यंत जवळपास या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जेपी व पीपी बिल्डर यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या प्रकल्पासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून गार्डन, व्हॉलिबॉल कोर्ट साठी 3.25 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यासाठी रोल मॉडेल ठरत असलेल्या या प्रकल्पासाठी डिपीडीसीच्या माध्यमातूनही पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देणार असल्याची घोषणा मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर, प्रा. बंडा गोडसे, नगराध्यक्ष स्वप्नील गोडसे यांनीही मनोगते व्यक्त केली.प्रास्ताविकपर भाषणातून उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व अॅड. प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, प्रतिष्ठित नागरिक, वडूज बार असोसिएशनचे सर्व सदस्य, वडूज नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, महिला भगिनी यांची उपस्थिती होती. नारायणराव पाटील, जयवंत पाटील, युवराज पाटील, अॅड. प्रशांत पाटील यांनी स्वागत केले. केले. प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.