जयश्री बागुल यांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मान
Updated On:

पुणे : पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री आबा बागुल यांना नुकतेच आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, जय शंकर ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्रीराम योग साधना,धनकवडी यांच्यावतीने ज्योतीकुमार अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
महापालिकेच्या सहायक आयुक्त सुरेखा शिंदे, रविंद्र गोलार,भारती विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील, माजी नगरसेविका अश्विनी भागवत या वेळी उपस्थित होत्या. मोबाईल, इंटरनेट ,व्हाट्सअप ,इंस्टाग्राम, ट्विटरच्या जगात मुलं पालकांपासून दूर जात आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवून कौटुंबिक आपलेपणा मुलांमध्ये वाढविण्याची नवी जबाबदारी आता प्रत्येक आईवर आल्याची भावना यावेळी बागुल यांनी मनोगत व्यक्त करताना केली.



