Jayanti Junnar – आणे (ता. जुन्नर) येथे शिवजयंती उत्सव गुरूवारी (दि. १९) मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणे गावाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. गावच्या वेशीवर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य व आकर्षक पुतळा उभारण्यात आला असून, त्याचे जरांगे पाटील यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित शिवभक्तांना आणि ग्रामस्थांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आणे गावच्या वतीने जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील मराठा समाजातील बांधव आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याप्रसंगी आणे गावचे उपसरपंच सुहास आहेर, पंचायत समितीचे सदस्य शांताराम दाते, डॉ. दीपक आहेर, मधुकर दाते, प्रकाश दाते, बंडू आहेर, रंगनाथ आहेर, बाळासाहेब दाते, चेअरमन माऊली संभेराव, शैलेश आहेर, पाटील गाडेकर, बाबाजी देशमुख यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाराजांच्या जयघोषाने आणे परिसरातील वातावरण शिवमय झाले होते.