जयंत पाटलांचा मोदींवरच निशाणा,’युक्रेन-रशिया युद्ध रोखलं, मग विनेशबाबत घडलं तेही रोखायला हवं’

Vinesh Phogat । पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. सर्व स्तरातून आता प्रतिक्रिया येत आहे. अशात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावरून मोदींना टोला लगावला आहे.
जयंत पाटील म्हणाले,’विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स गेले काही दिवस खूप चांगला होता, मग अचानक काय झाले. 50-100 ग्रॅम वजन कसे वाढले. जर ती जिंकून आली तर तिला काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती, तिने जे आंदोलन केले होते. ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल असे कोणाला वाटले का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत विनेश फोगाटच्या विजयानंतरही झालेल्या पराभवावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी है तो मुमकिन हैं असं म्हणतात, त्यांनी युक्रेन रशिया युद्ध रोखलं असं म्हणतात मग त्यांनी विनेशबाबत जे घडत आहे, ते रोखायला हवं’ असही पाटील यानी म्हटल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे
“विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. पण मला माहित आहे की आव्हानांना सामोरे जाणे हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही मजबूतीने कमबॅक करताल, आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत,” असे म्हणत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.





