Jayant Patil : ‘जयंत पाटील नीच अन् कपटी, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू; ‘या’ नेत्याची जहरी टीका

सांगली : भाजप आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. जयंत पाटील नीच अन् कपटी आहे. ते सगळ्यांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात पण आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम करू अशी टीका पडळकरांनी केली आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
‘जतमध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केला. मात्र जतच्या लोकांना सगळं कळतंय. कोणाला घरी घालवायचे अन् कोणाला नाही ते. हे जयंत पाटलांनी सांगायची गरज नाही, असा देखील टोला पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे. तसेच जयंत पाटील नीच अन् कपटी आहे. ते सगळ्यांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात पण आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम करू अशी टीका पडळकरांनी केली आहे.
इस्लामपूर पॅटर्न
‘जिल्ह्यात कर्ज थकीत ठेवून कारखाना विक्रीला काढायचा आणि परत स्वतः घ्यायचा असा जयंत पाटील यांचा इस्लामपूर पॅटर्न दहा वर्षापासून सुरू आहे. जत आणि सर्वैदयचा कारखाना घेतला. महाकाली बंद पाडला, आटपाडी कारखाना विकत घेण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.





