Jaya Bachchan : ‘प्रताप सिंह सारंगी हे पट्टीचे कलाकार’; जया बच्चन यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले

Jaya Bachchan | Pratap Sarangi | Rahul Gandhi । संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केली, त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेसने भाजपचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अश्यातच समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजपाचे खासदार प्रताप सिंह सारंगी हे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केले. ते पट्टीचे कलाकार असल्याचा टोला त्यांनी लावला. त्यांना उत्तम अभिनयाचा पुरस्कार देण्यात यावा असा चिमटा पण त्यांनी काढला.
भाजपाचा पलटवार :
जया बच्चन यांच्या आरोपानंतर आता भाजपाने पलटवार केला आहे. हीच इंडिया आघाडीची खरी संस्कृती असल्याचा आरोप त्यांनी केला. जया बच्चन या पीडित व्यक्तीसोबत नाही तर हल्लेखोरासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केला आहे आणि गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
गुरुवार, 19 डिसेंबर रोजी राहुल गांधींसोबत झालेल्या कथित बाचाबाचीत भाजपचे दोन खासदार जखमी झाल्यामुळे संसद परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हाणामारीत भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना दोन टाके पडले आहेत. त्याचबरोबर मुकेश राजपूत यांचा बीपीचा त्रास खूप वाढला आहे. सारंगी आणि मुकेश राजपूत हे सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
राहुल गांधींवर कोणते कलम लावण्यात आले :
राहुल गांधींवर कलम 115: स्वेच्छेने दुखापत करणे, कलम 117: गंभीर दुखापत करणे, कलम 125: जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे, कलम 131: गुन्हेगारी शक्तीचा वापर, कलम 351: गुन्हेगारी धमकी, कलम 3(5): समान हेतूसाठी कार्य करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





