साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण ! माओवाद्यांशी लढताना झाले शहीद

सातारा : सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यादरम्यान साताऱ्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत तर 2 जवान जखमी झाले आहे. शहीद जवानामध्ये साताऱ्यातील एका सुपुत्राचा समावेश आहे.
काय घडले नेमके?
अमर शामराव पवार असं या शहीद जवानाचं नाव आहे. अमर पवार हे मुळचे साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथील रहिवासी होते. अमर पवार यांना वीरमरण यांची माहिती गावात पसरताच गावावर शोककळा पसरली. शहीद अमर पवार हे आयटीबीपी 53 बटालियनचे जवान होते.
छत्तीसगड इथं नारायणपूर जिल्ह्यात ओरचा भागातून माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवण्यासाठी डीआरजी आयटीबीटीसह तीन विशेष पथकं गेली होती. अभियान राबवून परत येत असताना माओवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.





