Padma Awards 2022 : निरज व प्रमोदला पद्मश्री प्रदान
Updated On:

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पॅरा-बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांना काही दिवसांपूर्वी जाहिर झालेला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजधानीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळयात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नीरज आणि प्रमोदला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीरज आणि प्रमोद यांनी अनुक्रमे टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली होती.
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा नेमबाज अभिनव बिंद्रानंतरचा केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता. दुसरीकडे 33 वर्षीय प्रमोद पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू होता.





