जावेद अख्तर यांचे एक्स अकाऊंट हॅक; म्हणाले ऑलिम्पिकशी संबंधित पोस्ट…

Javed Akhtar | सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक विषयांवर ते आपले परखड मत मांडताना दिसतात. अनेकवेळा यासाठी त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो, यात आता जावेद अख्तर यांचे सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’ हॅक झाले आहे.
तसेच त्यांच्या अकाऊंटवरून ऑलिम्पिकशी संबंधित एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. मात्र ती पोस्ट जावेद अख्तर यांनी केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.जावेद अख्तरने 28 जुलै रोजी संध्याकाळी X खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना कळवले की आपले अकाऊंट हॅक करण्यात आले होते.
तसेच पॅरिसमध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघाविषयी एक पोस्ट त्याच्या खात्यावरून शेअर करण्यात आली आहे, जी त्यांमी पोस्ट केलेली नसून हॅकर्सनी केली आहे. नंतर ही पोस्ट काढून टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर अख्तर यांच्या चाहत्यांनी त्यांना पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. Javed Akhtar |
My X ID is hacked . There is a message ostensibly from my account about our Indian team for Olympics . It is totally harmless but not sent by me . We are in the process of complaining to the concern authorities in X .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 28, 2024
जावेद अख्तर यांनी पोस्टमध्ये काय लिहिले?
जावेद अख्तर यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “माझे एक्स खाते हॅक झाले आहे. माझ्या अकाऊंटवरून ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाबाबत एक पोस्ट करण्यात आली होती. त्यांनी ते पूर्णपणे हानिकारक असल्याचे वर्णन केले आहे. ही पोस्ट मी केलेली नाही,” अशी माहिती त्यांनी दिली. सध्या हे ट्विट आता हटविण्यात आले असून याबाबत जावेद यांनी एक्सच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. Javed Akhtar |
हेही वाचा:
काका- पुतण्यात कोण ठरणार वरचढ? सदस्यत्व राहणार की जाणार ? आज सर्वोच्च न्यायालयात फैसला





