Jasprit Bumrah Run up : १० वर्षांत पहिल्यांदाच बुमराहने बदलली ‘ती’ प्रसिद्ध शैली! क्राइस्टचर्च कसोटीत अचानक काय घडलं? समालोचकही झाले थक्क
Jasprit Bumrah Run up change : जसप्रीत बुमराहने क्राइस्टचर्च कसोटीची सुरुवात दोन दमदार अंदाजात केली, पण त्याला यश मिळाले नाही. मात्र, त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतील बदलाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले.

Jasprit Bumrah change his iconic bowling run-up Christchurch test : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या दहा वर्षांपासून आपल्या धारदार गोलंदाजीसह अनोख्या अॅक्शन आणि रन-अपसाठी जगभरात ओळखला जातो. मात्र, भारत आणि न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने आपल्या दशकभराच्या शैलीत अचानक बदल करून सर्वांनाच थक्क केले. सामन्याची सुरुवात त्याने नेहमीच्याच रन-अपसह केली होती, पण पहिल्या सत्रानंतर दिसलेल्या या बदलाने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या. (Jasprit Bumrah Run up)
नेमका काय बदल झाला बुमराहच्या रन-अपमध्ये? (Jasprit Bumrah Run up)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच बुमराहच्या वेगळ्या गोलंदाजी अॅक्शनची नेहमीच चर्चा राहिली आहे. क्रीजवर पोहोचण्यापूर्वी छोट्या रन-अपदरम्यान तो दोन्ही हातांनी चेंडू समोर असा धरतो की, शरीरासोबत एक त्रिकोण तयार होतो. क्राइस्टचर्चमध्येही त्याने अशीच सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या सत्रात अचानक त्याने दोन्ही हातांऐवजी केवळ उजव्या हातात चेंडू धरून धावण्यास सुरुवात केली, जसे सहसा इतर सर्वसामान्य वेगवान गोलंदाज करतात.
समालोचकही चक्रावले, २०१५ मधील जुना व्हिडीओ व्हायरल – (Jasprit Bumrah Run up)
https://t.co/kL85TpF3Bt
— CB (@cveditss) November 27, 2026
https://t.co/l2xap26dwj
— Bishontherockz (@BishOnTheRockx) November 27, 2026
बुमराहच्या रन-अपमधील हा अनपेक्षित बदल पाहून समालोचन करणारे पॅनेलमधील दिग्गजही हैराण झाले आणि त्यांनी यावर बराच वेळ सखोल चर्चा केली. काही क्षणांतच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. एका ‘एक्स’ वापरकर्त्याने थेट २०१५ मधील जुना व्हिडिओ पोस्ट करत, बुमराह आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत अगदी याच रन-अपसह गोलंदाजी करत असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.
अखेरच्या सत्रात जुनीच शैली, पण पहिल्या दिवशी विकेट्सविना – (Jasprit Bumrah Run up)
बुमराहने हा प्रयोग का केला याचे नेमके कारण समोर आलेले नाही, तसेच गोलंदाजीतही काही फरक दिसला नाही. दिवसाच्या अखेरच्या सत्रात नवा चेंडू घेताच तो पुन्हा दोन्ही हातांनी चेंडू धरण्याच्या जुन्याच अंदाजात परतला. पहिल्याच षटकात त्याने टॉम लॅथमला बाद केले होते, पण डीआरएसमुळे तो वाचला. १९ षटकांत केवळ ३७ धावा देऊनही बुमराहला पहिल्या दिवशी विकेट्स मिळाली नाही.





