Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गेली अनेक दिवसांपासून बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही, यावर सर्वांचे लक्ष होते. अखेर, बीसीसीआयने बुमराह या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोबतच, संघामध्ये देखील मोठे बदल करण्यात आले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. पाठीत वेदना होत असल्याने बुमराहला सामन्याच्या शेवटच्या डावातही खेळता आले नव्हते. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आली नव्हती.
आता अखेर बीसीसीआयने बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बुमराह पाठीच्या खालच्या भागातील दुखापतीमुळे 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
बुमराहच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी
बुमराह स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने नवीन खेळाडूची घोषणा केली आहे. बुमराहच्या जागी 23 वर्षीय गोलंदाज हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे. मागील काही सामन्यात हर्षित राणाने चांगली कामगिरी केली आहे. याशिवाय, यशस्वी जैस्वालला देखील अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
नॉन ट्रॅव्हलिंग सब्स्टीट्यूट- यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने…
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानं आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारतीय संघ गट टप्प्यात दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर रोहितची सेना दुबईत 4 मार्च रोजी या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळेल.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपूर्ण वेळापत्रक….
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची)
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)