Bumrah Vice Captaincy : रोहित शर्मा कर्णधार होताच बुमराहचा मोठा निर्णय! मुंबई इंडियन्सची उपकर्णधारपदाची ऑफर नाकारली
Bumrah Vice Captaincy declined : मुंबई इंडियन्सने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोहित शर्माला पुन्हा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बुमराहने उपकर्णधारपदाची ऑफर नाकारली होती.

Jasprit Bumrah politely declined the MI vice-captaincy offer : रोहित शर्माची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी झालेली अधिकृत निवड ही केवळ मागील तीन हंगामांतील निराशाजनक कामगिरीचा परिणाम नाही, तर ड्रेसिंग रूममधील तुटलेला विश्वासही यामागे मोठे कारण आहे. हार्दिक पंड्या कर्णधार झाल्यापासून संघातील ताळमेळ बिघडल्याने फ्रँचायझीने जुन्या नेतृत्वाकडे वळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हार्दिक पंजाब किंग्जमध्ये जाण्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच वेळच्या विजेत्यांनी रोहितकडे पुन्हा कमान देण्याचे निश्चित केले होते.
विश्वविजेत्या सूर्यकुमार यादवसह तिलक वर्मालाही नाही संधी –
नव्या कर्णधाराच्या निवडीत व्यवस्थापनाने यंदा भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादववर विश्वास दाखवला नाही. तसेच, जसप्रीत बुमराह किंवा भारतीय टी-२० संघाचा विद्यमान उपकर्णधार तिलक वर्मा यांनाही मुख्य दावेदार मानले गेले नाही. सूर्यकुमारला सर्वोच्च पदासाठी का डावलले हे व्यवस्थापनालाच ठाऊक आहे, तर तिलक वर्माकडे सध्या भविष्यासाठी तयार केला जाणारा खेळाडू म्हणून पाहिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जसप्रीत बुमराहने विनम्रपणे नाकारला उपकर्णधारपदाचा प्रस्ताव –
According to Sports Tak journalist Rahul Rawat, Jasprit Bumrah was offered the vice-captaincy of Mumbai Indians under Rohit Sharma’s leadership, but he politely declined the offer.
The big question now is: Is Bumrah planning something different ahead of the next mega auction? 👀
#IPL2027 #RohitSharma #JaspritBumrah
— CricInformer (@CricInformer) November 27, 2026
या सर्व घडामोडींत मुंबई इंडियन्सच्या ढाच्यातील सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. २०२५ च्या मेगा लिलावात बुमराहला १८ कोटी रुपयांत रिटेन केले होते, तर हार्दिक, रोहित व सूर्यकुमारने संघात राहण्यासाठी मानधनात कपात स्वीकारली होती. वृत्तानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोहितचे नाव निश्चित होताच व्यवस्थापनाने बुमराहला उपकर्णधारपदाचा प्रस्ताव दिला होता, जो त्याने अत्यंत विनम्रपणे नाकारला.
बुमराहचे जुने वक्तव्य अन् १४ हंगामांतील दमदार विक्रम –
🚨💙 𝗕𝗨𝗠𝗥𝗔𝗛 𝗡𝗢𝗧 𝗞𝗘𝗘𝗡 𝗢𝗡 𝗕𝗘𝗜𝗡𝗚 𝗠𝗜’𝗦 𝗗𝗘𝗣𝗨𝗧𝗬? 👀
Reports suggest Jasprit Bumrah is unwilling to take up the vice-captain’s role under Rohit Sharma at Mumbai Indians for IPL 2027. 🤯
#JaspritBumrah #RohitSharma #MumbaiIndians #IPL2027 https://t.co/ITGN0wsyzp
— SportsTiger (@The_SportsTiger) November 27, 2026
गेल्या हंगामात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार व बुमराहने आळीपाळीने नेतृत्व केले होते. २०२६ मध्ये हंगामी कर्णधार होताच बुमराह म्हणाला होता, “मी मुंबईचा कर्णधार होण्यापूर्वी कसोटी कर्णधार होईन, असे कधी वाटले नव्हते.” २०१३ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी अनोख्या गोलंदाजी अॅक्शनने चर्चेत आलेल्या बुमराहने आतापर्यंत १४ आयपीएल हंगामांत १८७ विकेट्स घेतले असून, तो आजही संघाची सर्वात मोठी ताकद आहे.





