IND vs WI : जसप्रीत बुमराहने WTC मध्ये रचला इतिहास, भारतात असा करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज

जसप्रीत बुमराहची कमाल –
जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात तीन बळी घेतले. त्याने सलामीवीर जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हस आणि जोहान लेन यांना माघारी पाठवले. यासह बुमराहने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) भारतीय भूमीवर ५० विकेट्स पूर्ण केले. तो डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय मैदानावर ५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आर अश्विन (१४९ विकेट्स) आणि रवींद्र जडेजा (९४ विकेट्स) यांनी डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय मैदानावर ५० पेक्षा जास्त विकेट्स घेतले आहेत, परंतु हे दोघे फिरकी गोलंदाज आहेत.
डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय मैदानावर १३ कसोटी सामने –
Congratulations to @Jaspritbumrah93, who has picked his 50th Test wicket in India in 24 innnings, the joint-fastest with Javagal Srinath among Indian fast bowlers.#TeamIndia pic.twitter.com/SdtBTRptxo
— BCCI (@BCCI) October 2, 2025
जसप्रीत बुमराहने डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय मैदानावर एकूण १३ सामने खेळले असून यात त्याने ५० विकेट्स घेतले आहेत. यादरम्यान एका डावात ४५ धावांत ६ विकेट्स घेणे हा त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बुमराहच्या यॉर्कर चेंडूला जगात तोड नाही आणि तो लयीत असताना कोणत्याही फलंदाजीच्या आक्रमणाची धूळधाण उडवू शकतात.
हेही वाचा – IND vs WI : भारताविरुद्ध पहिल्या डावात वेस्ट इंडिजची लज्जास्पद ‘शरणागती’, प्रथमच घडला असा कारनामा!
बुमराहचे भारतासाठी कसोटीत २०० हून अधिक विकेट्स –
जसप्रीत बुमराहची गणना भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. कारण त्याने अनेक सामन्यांत भारताला एकहाती विजय मिळवून दिले आहेत. त्याने २०१८ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांने ४९ कसोटी सामन्यांत एकूण २२२ विकेट्स घेतले असून यात १५ वेळा पाच विकेट्स घेण्याचा समावेश आहे.





