DC vs MI : बुमराह आणि नायरच्या वादाची रोहितने घेतली मजा, VIDEO होतोय व्हायरल

DC vs MI Rohit enjoy Bumrah and Nair fight video viral : जसप्रीत बुमराह मैदानावर आपला संयम गमावून विरोधी संघाच्या खेळाडूंशी वाद घालताना पाहणे फारच दुर्मिळ आहे. चाहत्यांनी शेवटचे हे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान पाहिले होते, जेव्हा बुमराहचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कॉन्स्टासशी वाद झाला होता. आता आयपीएल २०२४ मध्येही बुमराहला असे करताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यावेळी रोहित शर्माने या घटनेवर रिअॅक्शन दिली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होता.
यावेळी बुमराहचे लक्ष्य दुसरे तिसरे कोणी नसून भारतीय फलंदाज करुण नायर होता. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद झाला जो माजी कर्णधार रोहित शर्माने आनंदाने अनुभवला. दरम्यान, हार्दिक पंड्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसला.
रोहित शर्माने बुमराह-नायरच्या वादाची घेतली मजा –
The average Delhi vs Mumbai debate in comments section 🫣
Don’t miss @ImRo45 ‘s reaction at the end 😁
Watch the LIVE action ➡ https://t.co/QAuja88phU#IPLonJioStar 👉 #DCvMI | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/FPt0XeYaqS
— Star Sports (@StarSportsIndia) April 13, 2025
दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या सहाव्या षटकानंतर ही घटना घडली, जेव्हा करुण नायरने जसप्रीत बुमराहची धुलाई केली. नायरने बुमराहच्या एकाच षटकात १८ धावा काढून २२ चेंडूत त्याचे ११ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. बुमराहच्या या षटकात नायरने २ षटकार आणि १ चौकार लगावला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नायर दोन धावा घेत असताना, तो नॉन-स्ट्रायकर एंडवर जसप्रीत बुमराहला आदळला. मात्र, नायरने याबद्दल माफीही मागितली होती.
सामन्यानंतरही बुमराह आणि नायर चर्चा करताना –
Karun Nair and Bumrah discussing after the match 😂#KarunNair #JaspritBumrah #MIvsDC #DCvsMI pic.twitter.com/ui73rgFElh
— Sheeth 🔻 (@iTheBeliver) April 14, 2025
पण जेव्हा टाईम आऊट झाला, तेव्हा जसप्रीत बुमराह त्याच्या संघातून बाहेर आला आणि करुण नायरशी वाद घालताना दिसला. यावेळी हार्दिक पंड्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर रोहित शर्माने हा वाद पूर्णपणे एन्जॉय केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सामन्यानंतरही बुमराह आणि नायर या विषयावर चर्चा करताना दिसले.
हेही वाचा – DC vs MI : मुंबईनं मारलं दिल्लीचं मैदान! उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर रोखला राजधानीचा विजयरथ
सामन्याबद्दल बोलायचे, तर मुंबई इंडियन्सने देशाच्या राजधानीत येऊन आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या पराभवाच्या मालिकेला पूर्णविराम दिला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाने दिल्लीचा १२ धावांनी पराभव केला. यासह दिल्लीचा विजयरथ रोखला. यंदाच्या हंगामातील हा दिल्लीचा पहिलाच पराभव ठरला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९ षटकांत १९३ धावांत गारद झाला.





