World Cup 2023 : इंग्लंड संघात मोठा बदल; ‘या’ स्फोटक फलंदाजाला वगळलं अन्…

लंडन :- भारतात पुढील महिन्यात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी इंग्लंडने आपला संघ खूपच लवकर जाहीर केला होता. मात्र, आता त्यात एक मोठा बदल करण्यात आला असून धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय याला आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी हॅरी ब्रुक्सला संघात स्थान देण्यात आले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत ब्रुक्सने सातत्याने धावा केल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. रॉयनेही गेल्या काही मालिकांमध्ये फारशी चमकदार कामगिरी केलेली नसल्यानेच त्याचे संघातील स्थान गेले आहे.
विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
दरम्यान, पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेटचा महाकुंभ एकदिवसीय विश्वचषक सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.






