Jasmine Sandlas : ‘धुरंधर’ फेम गायिकेने भर कॉन्सर्टदरम्यान केली साखरपुड्याची घोषणा
Jasmine Sandlas : जॅस्मिनने २०१४ मध्ये सलमान खानच्या 'किक' चित्रपटातील गाण्याने बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिंगला सुरुवात केली

Jasmine Sandlas : ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्याला आपला दमदार आवाज देणारी गायिका जॅस्मिन सँडलास सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
नुकतेच दिल्लीत आयोजित ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’ दरम्यान तिने प्रेक्षकांना तिच्या साखरपुड्याची गूड न्यूज देत सर्वांनाच चकित केले. जॅस्मिनने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवरच तिच्या होणाऱ्या पतीची सर्वांशी ओळख करून दिली आणि आपल्या साखरपुड्याची अंगठीही फ्लॉन्ट केली.
दिल्लीत पार पडलेल्या तिच्या ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’च्या पहिल्याच दिवशी जॅस्मिनने तिचा होणारा नवरा शेखर चौधरीला स्टेजवर आमंत्रित केले. त्यानंतर तिने तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांसमोर आपली साखरपुड्याची अंगठी दाखवली. ही आनंदाची बातमी ऐकताच कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या तिच्या चाहत्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या जोडप्याचे अभिनंदन केले.
जॅस्मिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साखरपुड्याच्या घोषणेनंतर या जोडीने जॅस्मिनच्या ‘लावां’ या गाण्यावर सुंदर डान्स केला, ज्यामुळे हा क्षण आणखी रोमँटिक बनला. मात्र जॅस्मिन लग्न कधी करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
View this post on Instagram
बेंगळुरू आणि चंदीगडमध्येही होणार कॉन्सर्ट
दिल्लीतील या कॉन्सर्टसोबतच जॅस्मिनच्या ‘इंडिया टूर’ची दणक्यात सुरुवात झाली आहे. दिल्ली कॉन्सर्टदरम्यान तिने ‘तरस’, ‘इलीगल वेपन’, ‘लावां’, ‘पंजेबा’ आणि ‘सिप सिप’ यांसारखी तिची अनेक सुपरहिट गाणी गायली. ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’ अंतर्गत ती १८ जुलै रोजी मुंबईत, २५ जुलै रोजी बेंगळुरूमध्ये आणि २९ ऑगस्ट रोजी चंदीगडमध्ये परफॉर्म करणार आहे.
सलमान खानच्या चित्रपटातून केले होते बॉलिवूड पदार्पण
पंजाबी संगीत सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर, जॅस्मिनने २०१४ मध्ये सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील ‘यार ना मिले’ या गाण्याने बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिंगला सुरुवात केली. यानंतर तिने ‘मुंज्या’ चित्रपटातील ‘तरस’, ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ आणि टायटल ट्रॅक, तसेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ मधील ‘मै और तू’ आणि ‘जाइए सजना’ सारखी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.
हेही वाचा :





