Manoj Jarange : जरांगे फडणवीसांवर बरसले, थेट इशारा देत म्हणाले “आम्ही मराठ्याची औलाद…आता…”

Manoj Jarange : गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांना आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी त्यांना कोर्टाने नोटीसही बजावली आहे. याशिवाय कोर्टाने मुंबईत नवीन आंदोलक येवू नये असं देखील सांगितलं आहे. कोर्टाने घेतलेल्या निर्णयानंतर आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
आम्ही मराठ्याची औलाद आहोत. सरकारने कितीही भीती दाखवली तरी मी आझाद मैदान सोडणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. सरकार आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याला यश येणार नाही. आम्ही आरक्षणाशिवाय हटणार नाही, असा निर्धार केल्याचं जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
मेलो तरी चालेल, पण…
फडवणीस यांनी आमच्यासोबत अन्यायकारक वागत आहे. देवेंद्र फडणवीस न्यायालयाला खोटी माहिती देतात, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे. आमची सरकार सोबत चर्चेला तयारी आहे, पण आता हैदराबाद आणि सातारा संस्थान गॅझेट मला पाहिजे, असं जरांगेंनी ठणकावून सांगितलं आहे. आमची संख्या साडे नऊ पट जास्त आहे. आझाद मैदानावर मेलो तरी चालेल, पण हटणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
जरागेंनी हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅझेटविषयी महत्वाचं भाष्य केलं आहे. 30, 35 मंत्री नाही तर दोघे या. त्यांचा आम्ही सन्मान करू, असं म्हणत जरागेंनी सरकारसोबत एक प्रकारे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटला तुमची काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबईकर कोण आणि मराठा कोण हे कळणार नाही.
वेशीवर मराठे अडवले तरी ते शनिवार रविवार मुंबईमध्ये येतील, त्यानंतर सोमवारी फडणवीसांना मुंबईकर कोण आणि मराठा कोण हे कळणार नाही. यामुळे आता आगामी काळात आंदोलन सुरूच राहणार असल्याची स्पष्टता मनोज जरागेंनी केली आहे. तसेच त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सरकारची डोकेदुखी वाढली आहे. जरागेंनी थेट आंदोलन अधिक तीव्र होण्याचा इशाराच सरकारला दिला आहे. त्यामुळे आता सरकारकडून कोणती पाऊल उचलली जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.





