Japan : जपानमधील जन्मदराचे घटले प्रमाण; Birth Rate वाढवण्यासाठी सरकारकडून खास…

टोकियो – जपानमधील जन्मदराचे प्रमाण झपाट्याने घटले असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी जपानमधील जन्मदराचे प्रमाण विक्रमी नीचांकी पातळीवर होते. या वर्षी देखील जपानमधील जन्मदराचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण गेल्या वर्षापेक्षाही कमी असल्याचे आढळून आले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे, असे सरकारी प्रवक्त्याने म्हटले आहे.
आता जपानमधील जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी खास उपाय योजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी युवकांना विवाह करण्यास आणि अपत्ये जन्माला घालण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. जपानमधील कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सूनो यांनी ही माहिती दिली आहे.
या वर्षी जपानमध्ये जानेवारी पासून सप्टेंबर महिन्यापर्यंत 5,99,636 अपत्यांचा जन्म झाला. या वर्षी आतापर्यंतच्या अपत्यांच्या जन्माच्या आधारे किती अपत्ये वर्षाच्या अखेरीपर्यंत जन्म घेतील, त्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. गेल्या वर्षी जन्म झालेल्या अपत्यांच्या तुलनेत या वर्षी जन्म झालेल्या अपत्यांची संख्या 4.9 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये 8 लाख 11 हजार बालकांचा जन्म झाला होता.
जपान ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे. मात्र तेथील रहाणीमान महाग आणि उत्पन्नातील वाढ खूपच संथ आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि अल्पसंख्यांना सामावून घेण्यास तेथील सरकारचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. यापूर्वी गर्भधारणेच्या काळात आणि नवीन अपत्याच्या संगोपनासाठी अनुदान देखील दिले गेले होते. मात्र तरी आतापर्यंत नवीन अपत्ये जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही.

