Japan Squad Announced : टीम इंडियाविरुद्धच्या ऐतिहासिक टी- 20 सामन्यासाठी जपानकडून संघ जाहीर
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या रणधुमाळीपूर्वी (Japan Squad Announced) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर एक अतिशय रोमांचक आणि ऐतिहासिक वळण पाहायला मिळणार आहे.

Japan Squad Announced : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या रणधुमाळीपूर्वी (Japan Squad Announced) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर एक अतिशय रोमांचक आणि ऐतिहासिक वळण पाहायला मिळणार आहे.
भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘सुझुकी कप’ अंतर्गत एका विशेष टी-२० सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि नुकताच टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी जपान क्रिकेट बोर्डाने आपला १५ सदस्यीय तगडा संघ मैदानात उतरवला आहे.
या ऐतिहासिक लढतीसाठी जपानने (Japan Squad Announced) आपल्या सर्वात यशस्वी आणि आक्रमक फलंदाजाकडे नेतृत्व सोपवले आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २ शतके आणि १२ अर्धशतकांसह ५५ सामन्यांत १,८७१ धावा कुटणारा स्टार खेळाडू केंडल कडोवाकी-फ्लेमिंग संघाची धुरा सांभाळेल. त्याचा १३९.४१ चा तडाखेबंद स्ट्राईक रेट आणि ३८.१८ ची सरासरी भारतीय गोलंदाजांसमोर कडवे आव्हान उभे करू शकते. त्याला साथ देण्यासाठी अनुभवी इब्राहिम ताकाहाशी आणि डेक्लान सुजुकी-मॅकॉम्ब सज्ज आहेत.
जपान संघ (Japan Squad Announced) सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत ४१ व्या स्थानावर असला, तरी भारतीय संघाला चकित करण्याची पूर्ण रणनीती त्यांनी आखली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला आपला आदर्श मानणारा आणि जपानचा सर्वाधिक बळी घेणारा अव्वल लेगस्पिनर माकोतो तानियामा भारतीय फलंदाजांची फिरकी घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या जेक कुसुदा-नैर्न या युवा फिरकी अष्टपैलू खेळाडूला संधी मिळाली असून, मध्यमगती गोलंदाज त्सुयोशी ताकाडा आणि यष्टीरक्षक वतारू मियाउची यांचाही संघात समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबरपासून आणि क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबरपासून सुरू होत असताना, त्याआधी रंगणारा हा सामना दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे.
जपानचा संघ
केंडल कडोवाकी-फ्लेमिंग (कर्णधार), चार्ली हारा-हिंजे, बेंजामिन इटो-डेविस, एलेस्टर कडोवाकी-फ्लेमिंग, कोहेई कुबोटा, जेक कुसुदा-नैर्न, वतारू मियाउची (यष्टीरक्षक), रेओ सकुरानो-थॉमस, एलेक्स शिराई-पॅटमोर (यष्टीरक्षक), शोमा सुगाया-स्लेटर, डेक्लान सुजुकी-मॅकॉम्ब, त्सुयोशी ताकाडा, इब्राहिम ताकाहाशी, माकोतो तानियामा, लाचलन यामामोटो-लेक.
कुठे पाहता येईल भारत-जपान यांच्यातील सामना?
स्पोर्ट्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म FanCode ने भारत आणि जपान यांच्यातील सामन्याचे भारतातील एक्सक्लुझिव्ह डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार मिळवले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते २२ सप्टेंबरला FanCode वर हा सामना LIVE पाहू शकतील. याशिवाय स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टावर देखील सामन्याचा आनंद घेता येणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होईल.






