Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीत हाय अलर्ट! 5 मेट्रो स्थानकं बंद; जंतरमंतरवर वॉटर कॅनन, RAFचा कडक बंदोबस्त
Jantar Mantar Protest Delhi: नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी नाट्यमय वळण मिळाले.

Jantar Mantar Protest Delhi: नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी नाट्यमय वळण मिळाले. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (abhijit dipake) यांच्या नेतृत्वाखाली आज संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याने राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
कायदोव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा तीर्थ ही पाच महत्त्वाची मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Jantar Mantar Protest Delhi)
जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) तसेच निमलष्करी दलाचे मोठे पथक तैनात करण्यात आले आहे. संभाव्य जमाव नियंत्रणासाठी घटनास्थळी वॉटर कॅनन आणि दंगल नियंत्रणासाठी वापरली जाणारी ‘वज्र’ वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, परिसरात मोबाईल जॅमर्स बसवण्यात आल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. (Jantar Mantar Protest Delhi)
रविवारी रात्रीपासून जंतरमंतर परिसरातील पोलिसांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले असून, काही ठिकाणचे बॅरिकेड्सही हटवण्यात आले आहेत.
#WATCH | Delhi: Central Secretariat Metro Station closed for public in view of a proposed march to Parliament by CJP today, 20th July.
Delhi Metro Rail Corporation (DMRC) tweets, “Due to security reason, Janpath, Rajiv Chowk, Patel Chowk, Central Secretariat and Seva Teerth… pic.twitter.com/SOrlKvYaXp
— ANI (@ANI) July 20, 2026
यापूर्वी आंदोलनादरम्यान 20 दिवस आमरण उपोषण केलेले पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचूक यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. (Jantar Mantar Protest Delhi)
दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पोलीस कारवाईवर आंदोलकांनी आक्षेप घेतला आहे. आंदोलनकर्त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत, परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्यास तसेच संपूर्ण घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आवाहन केले आहे. (Jantar Mantar Protest Delhi)
आंदोलकांचा दावा आहे की, गेल्या महिनाभरापासून आंदोलन पूर्णपणे शांततामय पद्धतीने सुरू असून, संसदेकडे प्रस्तावित मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. मात्र, या दाव्यांबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. (Jantar Mantar Protest Delhi)





